अशी झाली 'उलीशी' श्रीरामनवमी सुरू..
श्री समर्थ लहानुजी महाराजांचे शिष्य श्री नामदेव महाराज हे गव्हानिपाणी या गावात राहतात. तिथे श्री सत्यदेव बाबा रामनवमीसाठी जात असत. दरवर्षीप्रमाणे १९७१ ची श्रीरामनवमी करण्यासाठीसुद्धा श्री समर्थ सत्यदेव बाबा, श्री सत्य नामदेव महाराजांकडे गव्हानिपाणी येथे गेले. याप्रसंगी कावलीचे श्री. बाबासाहेब इंगळे, आसऱ्याचे श्री. उद्धवराव देशमुख, पिंपळखुटा येथील पुंडलिकराव रुद्रकार, श्री. नामदेवराव धामंदे, श्री. मारोतराव वानखडे हे सोबत होते.
परंतु या वेळी श्री समर्थ सत्यदेव बाबांना काय वाटले कुणास ठाऊक, ते श्री नामदेव महाराजांकडे गेले, थोडा वेळ थांबले व सोबतच्या सर्वांना घेऊन कावली येथे गेले. तेथून तडक पिंपळखुट्याला आश्रमात परत आले. आपल्याबरोबर श्री संत शंकर महाराजांना उद्देशून म्हणाले, "आता याच्यापुढे आपली रामनवमी इथे करत जाऊ, पतली पतली दाळभाजी अन् कण्या कराव! व उलीशी रामनवमी कराव!" असा आदेश श्री समर्थ सत्यदेव बाबांनी दिला व तो श्री समर्थ शंकर बाबांनी शिरोधार्य मानला. आज या उलीशी 'रामनवमीचे स्वरूप अवर्णनीय असे झालेले आहे. अजूनही रामजन्म सोहळ्याच्या दिवशी महाप्रसादासोबत कण्यासुद्धा असतातच. रामजन्म सोहळा हृदयी साठवत, बाबांच्या अमृतवाणीचे रसपान करून भक्त धन्य होतात. अशाप्रकारे श्री समर्थ सत्यदेव बाबांनी सुरू केलेल्या आश्रमावरील या 'उलीशा' रामनवमीच्या लीलेचे रहस्य गुरु-शिष्य दोघेच जाणोत. या उत्सवात सामूहिक विवाह देखील पार पडतात.
असा झाला समर्थांचा प्रकटदिन सुरू..
श्री समर्थ सत्यदेव बाबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित केला होता. त्याच वेळी समर्थ सत्यदेव बाबांनी उपस्थितांना आदेश दिला, “आमच्या वाल्याचा असाच करत जा!" तेव्हापासून श्री समर्थ सत्यदेव बाबांच्या आदेशाचे पालन म्हणून केवळ श्री समर्थ शंकर बाबांनी प्रकट दिन साजरा करण्याला परवानगी दिली आणि हरतालिकेच्या दिवशी म्हणजे शु. ३ भाद्रपद या तिथीवर त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे.
क्रमांक | दिनांक आणि तिथी | स्थळ |
---|---|---|
1 | दि. १६ जानेवारी २०२३ पौष कृ. ९ श्री संत शंकर बाबा महाराज यांचा लुटिचा कार्यक्रम | पिंपळखुटा |
2 | दि. १९ फेब्रुवारी २०२३ माघ कृ. १४ महाशिवरात्री महोत्सव | नागपूर आश्रम |
3 | दि. २० फेब्रुवारी २०२३ माघ कृ. ३० महाशिवरात्री महोत्सव | सावरी आश्रम (भंडारा) |
4 | दि. २२ फेब्रुवारी २०२३ फालगुन शु. ३ श्री संत लहानुजी महाराज जयंती. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा आणि मंगरूळ दस्तगीर |
5 | दि. ६ मार्च फाल्गुन २०२३ शु. १४. श्री रामनवमी महोत्सव सभा व पत्रिका, पोस्टरर्स वाटप. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
6 | दि. ३० मार्च २०२३ चैत्र शु. ३ ते चैत्र शु. ९ श्री रामनवमी महोत्सव. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
7 | दि. ६ एप्रिल २०२३ चैत्र शु. १५ हनुमान जयंती जळीचे मारुती मंदिर अणि श्री संत सत्यदेव बाबा जयंती. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
8 | दि. २० एप्रिल २०२३ चैत्र कृ. ३० श्री संत शंकर बाबांचे पिता श्री संत बुवाजी महाराज यांची. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
9 | दि. ३० जुन २०२३ आषाढ शु. १२ श्री रामभाऊ दादा (पुण्य सोहळा). | श्रीक्षेत्र पिंपळखुटा आणि मंगरूळ दस्तगीर |
10 | जुन २०२३ आषाढ शु. ११ देवशयनी आषाढी एकादशी वारी पिंपळ ते पंढरपुर. | पिंपळखुटा ते पंढरपुर |
11 | दि. ०३ जुलै २०२३ आषाढ शु. १५ व्यास पुजा गुरूपौर्निमा. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
12 | दि. ३१ ऑगस्ट २०२३ नि. श्रवण शु. १५ / कृ.१ श्री संत लहानुजी महाराज पुण्यतिथी. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
13 | दि. ०३ सप्टेंबर २०२३ भाद्रपद हरीतालीका श्री संत शंकर बाबा यांचा प्रगटदिन महोत्सव. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
14 | दि. २ ऑक्टोंबर २०२३ भाद्रपद कृ.३/४ सत्यदेव बाबा पुण्यतिथी. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
15 | दि. २२ ऑक्टोबर २०२३ आश्विन सु. ८. श्रीमती कमलाआजी गायगवाड यांची पुष्यतिथी. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
16 | दि. २७ ऑक्टोबर २०२३ आश्विन शु. १३/१४ श्री संत शंकर महाराज अंदपारायण महोत्सव. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
17 | दि. २८ ऑक्टोंबर २०२३ अश्विन शु. १५ कोजागीरी पौर्णिमा. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
18 | दि. २ नोव्हेंबर २०२३ अश्विन कृ.५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौन श्रध्दांजली कार्यक्रम. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
19 | दि. २८ नोव्हेंबर २०२३ कार्तीक कृ.१ श्री संत मायाबाई महाराज पुण्यतिथी, श्री संत आडकुजी महाराज पुण्यतिथी, काकडा समाप्ती, चर्तुमास समाप्ती. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
20 | दि. ९ ते ११ डिसेंबर २०२३ कार्तिक कृ. १२/१३/१४. संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा आळंदी. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |
21 | दि.२३ डिसेंबर २०२३ मार्गशीर्ष ११ / १२ वर्धापन दिन सोहळा पंढरपूर. | वैकुंठयाम पंढरपूर |
22 | मार्गशीर्ष कृ. १५ अमावास्या श्री संत भागीरताआई पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम. | श्रीक्षेत्र पिंपळखुटा |